About Us

आमच्याविषयी – Watatya

पारंपारिक अर्थाने, वाटाड्या म्हणजे पूर्वीच्या काळात प्रवासी, व्यापारी किंवा यात्रेकरूंना योग्य दिशा दाखवणारा आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम करणारा माणूस. व्यापक अर्थाने खरी माहिती पुरवणारा आणि सच्चा दिशादर्शक! आमचं पण हे असचं!

Watadya.in हे एक प्रामाणिक, विश्वसनीय आणि सर्वसमावेशक बातमी पोर्टल असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ग्रामीण घडामोडींवर सखोल आणि वस्तुनिष्ठ माहिती पुरवते. लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून जबाबदारी पार पाडत समाजाला योग्य, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ माहिती प्रदान करणे हे आमचे ध्येय!

नुसत्या राजकारणाच्या बातम्याच नाही तर आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अर्थ, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, सामान्यज्ञान, सामाजिक चळवळी, स्वयंपाकाच्या रेसिपीज, विशेष व्यक्तिमत्त्व आणि मुलाखती यासारख्या विविध विषयांवरील दर्जेदार आणि माहितीपूर्ण लेख वाचायला मिळतील. शहरी तसेच ग्रामीण भागातील बातम्यांना समान महत्त्व देत, आम्ही तळागाळातील जनतेचे प्रश्न आणि समस्या यांना आवाज देण्याचा प्रयत्न करतो.

आम्ही मानतो की बातमी ही फक्त बातम्यांपुरतीच मर्यादित नसावी, तर ती समाजात सकारात्मक बदल घडवणारी प्रभावी माध्यम ठरावी. म्हणूनच, Watadya.in हे केवळ बातम्यांचे व्यासपीठ नसून, विचारप्रवर्तक चर्चा घडवणारा आणि जनतेला जागरूक करणारा एक मंच आहे.

आमच्याशी जुळून राहण्यासाठी तसेच ताज्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी Watatya.in ला नियमितपणे भेट द्या! सप्रेम नमस्कार!